भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनाम म्हणतां संसाराचें भय । म्हणती त्याच्या होय जिव्हे कुष्ट

ramanam mhanatan sansarachen bhay | mhanati tyachya hoy jivhe kushta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रामनाम म्हणतां संसाराचें भय । म्हणती त्याच्या होय जिव्हे कुष्ट ॥१॥ अमृत सेवितां कैंचेम ये मरन । जाणती हे खूण अनुभवी ॥२॥ ज्याची एकवृत्ति रामनामीं प्रीति । असतां कैसे होती गर्भवास ॥३॥ नामा म्हणे नामीं दृढ भाव धरा । आत्म-हित करा जाणते हो ॥४॥