भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजयासी सर्व वृत्तांत ठाउका । असोनी बाळका पाही नातो

rajayasi sarva vruttant thauka | asoni balaka pahi nato

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राजयासी सर्व वृत्तांत ठाउका । असोनी बाळका पाही नातो ॥१॥ कामीक जगासी कामचि आवडे । स्त्रीमोहानें वेडे झाले बहु ॥२॥ रावणानें वेदां ऋचा पदें केलीं । सीतेलागीं आली भ्रांती कैसी ॥३॥ पाराशरा ऐसा दासीसी शमन । हें नव्हे बोलणें आश्चर्याचें ॥४॥ विश्वामित्र झाला रंभेपाठीं श्वान । सांडोनि अभिमान तपाचाही ॥५॥ नामा म्हणे कोण तयासी टाळील । प्रारब्ध करील तेंचि खरें ॥६॥