भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजाई तें पुसे अहो नामयाला । करा जेवायला कांहीं यासीं

rajai ten puse aho namayala | kara jevayala kanhin yasin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राजाई तें पुसे अहो नामयाला । करा जेवायला कांहीं यासीं ॥१॥ प्रातःकाळीं घरीं सारूनि भोजन । आले ते चालून माझे भेटी ॥२॥ नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ति । भोजन निश्चिती करुं नये ॥३॥ उदईक हरिदिनीं उपवास जागरण । ऐकावें कीर्तन चार प्रहर ॥४॥ द्वादशीं पारणें जालिया भोजन । ऐकोनी पाहुणे चिंतातुर ॥५॥ क्षुधातुर पोटीं निद्रा नलगे कांहीं । वर्षाएवढी पाही रात्र जाली ॥६॥