भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजा म्हणे बाळा देतों पंच ग्राम । तो म्हणे आत्माराम देता आहे

raja mhane bala deton panch gram | to mhane atmaram deta ahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राजा म्हणे बाळा देतों पंच ग्राम । तो म्हणे आत्माराम देता आहे ॥१॥ आशा सांडोनियां निराश जाहला । शरण देवाला जावयासी ॥२॥ चतुर्थ भागानें राज्य घे वांटोनी । म्हणे चक्रपाणी देता आहे ॥३॥ अर्धें भूमंडळ घेईंरे उदारा । म्हणे विश्वंभरा लाज माझी ॥४॥ संपूर्ण हे महि तुजचि वोपीन । म्हणे नारायण सांभाळील ॥५॥ नामा म्हणे ऐसा गणीना भूपातें । निश्चय चितांत एक झाला ॥६॥