भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजा ह्मणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसीं सांग आतां

raja hmane ichchha tujhiye manasin | dohale majasin sang atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राजा ह्मणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसीं सांग आतां ॥१॥ येरी ह्मणे ऐसें वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्य-पट ॥२॥ ज्येष्ठासी धाडावें दुरी दिगंतरा । नये समाचार त्याचा आह्मां ॥३॥ जनांत हें निंद्य वेदबाह्य कर्म । करितां अधर्म पाप बहू ॥४॥ माझिये मस्तकीं ठेवावा हा दोष । तुम्हांकडे लेश नाहीं नाहीं ॥५॥ निंदितील जन मज वाटे सुख । ऐकतांची दु:ख राया झालें ॥६॥ वृश्चिकाचे पेंवीं तक्षक पडत । घालिताती घृत अग्निमुखीं ॥७॥ ऐशी व्यथा होय नामा ह्मणे त्यासी । उठिला त्वरेसी तेथूनियां ॥८॥