भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहिला पाऊस निघावें बाहेर । सांगे विश्वंभर सक-ळांसी

rahila paus nighaven baher | sange vishvambhar sak-lansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राहिला पाऊस निघावें बाहेर । सांगे विश्वंभर सक-ळांसी ॥१॥ दीनबंधू तेव्हां ठेवी पर्वतासी । भेटती देवासी सकळीक ॥२॥ आयुष्य बहुत तुज होवो कृष्णा । वांचविले प्राणा सकळांच्या ॥३॥ विष्णुदास नामा ओंवाळून जाय । येगे माझे माय भेटी देईं ॥४॥