भजनी मालिका
← भजनांकडे परत

राही रखुमाई सत्यभामा माता । सिकवा वो कांता बहुतां परी

rahi rakhumai satyabhama mata | sikava vo kanta bahutan pari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राही रखुमाई सत्यभामा माता । सिकवा वो कांता बहुतां परी ॥१॥ संत सनकादिक साक्ष हे सकळ । येणें माझें बाळ चाळविलें ॥२॥ हा काय आमुचा धनी कीं गोसावी । नाहीं तें शिकवी लेंकुरासी ॥३॥ जाला देव तरी पडों याच्या पायां । मैंदावें केलिया भलें नव्हे ॥४॥ भीड तुटलिया नेईन चोघां चारीं होईल समसरीं याची मज ॥५॥ देव कांहीं आम्ही नसति ऐकिले । परी नाहीं देखिले ऐसे कोठें ॥६॥ दर्शनेंचि जेथें जीवित्वाची हानी । नाठवे परतोनि घराचारा ॥७॥ कैंची वो पंढरी मी वो काय जाणे । याच्या पुत्रपणें देखियेलीं ॥८॥ याअ देवासी भेटी जन्ममरण तुटी । मावळली गोष्टी संसराची ॥९॥ तुम्ही अवघ्याजणी जीवाच्या सांगातिणी । पुसा याचे मनीं काय आहे ॥१०॥ देऊनियां नामा मज लावा वाटे । गोणाई म्हणे वोखटें न करा देवा ॥११॥