भजनी मालिका
← भजनांकडे परत

राही रखुमाई ऋद्धिसिद्धि जेथें । पडलें पर्वत पक्वान्नांचे

rahi rakhumai ruddhisiddhi jethen | padalen parvat pakvannanche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राही रखुमाई ऋद्धिसिद्धि जेथें । पडलें पर्वत पक्वान्नांचे ॥१॥ बैसल्या त्या पंक्ति भोगावती तीरीं । पात्रें टाकी हरि वैष्णवाला ॥२॥ विसोबा खेचर पुंडलिक संगें । वाढी पांडुरंग वैष्णवाला ॥३॥ संत्तसभेमाजीं निवृत्ति सोपान । यथाविधी प्रमाण संपादिलें ॥४॥ रखुमाईला देवें सांगितली खूण । सोडितो पारणें नामा म्हणे स्वामी जातो बोलावण । आणितो सोपान भोजनासी ॥६॥