भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुष्पासी परिमळु दूध घृत मेळु । ऊंस तो रसाळु बीज नाहीं

pushpasi parimalu dudh ghrut melu | uns to rasalu bij nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुष्पासी परिमळु दूध घृत मेळु । ऊंस तो रसाळु बीज नाहीं ॥१॥ तैसें परब्रह्म आहे तें निर्वाण । वर्णितां पुराण नपडे ठायी ॥२॥ दीपाचीही दीप्ति दर्पणची कांति । तैसी ब्रह्ममति कवण जाणे ॥३॥ नामा ह्मणे जैसें सर्वांघटीं आकाश । केशव परमहंस तैसा जाणे ॥४॥