भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्व पुण्य माझें फळोन्मुख जालें । प्रत्यक्ष भेटले पांडुरंग

purva punya majhen phalonmukh jalen | pratyaksha bhetale pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्व पुण्य माझें फळोन्मुख जालें । प्रत्यक्ष भेटले पांडुरंग ॥१॥ संसारीं आसक्त मायामोहें रत । तापत्रयीं संतप्त जाले जीव ॥२॥ ऐसिया पतिताचा करावया उद्धार । यालागीं अवतार तुमचा जगीं ॥३॥ तरी मी एक मूढ मतिहीनु । चरनींचा रजरेणू संतांचिया ॥४॥ म्हणोनि पंढरीनाथ पाळितसे मातेम । प्रेमजीवन भातें देवोनियां ॥५॥ आजि स्वामीनीं पाहिलें कृपादृष्टिं । केली सुखवृष्टि अनिवार ॥६॥ नामा म्हणे तुमच्या चरणाचा आधार । ठाकिन पैलपार भवनदीचा ॥७॥