भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिक वरद आनंदें अभेद । विठ्ठल विद्‌गद नाम तुझें

pundalik varad ananden abhed | viththal vid‌gad nam tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुंडलिक वरद आनंदें अभेद । विठ्ठल विद्‌गद नाम तुझें ॥१॥ पाव गा वेगीं मजालागीं झडकारी । बुडतों भवसागरीं तारी मज ॥२॥ आकांत अवसरीं स्मरिला गजेंद्र । दिनानाथ ब्रीद साच केलें ॥३॥ स्मरली संकटीं द्रीपदी वनवासी । धांवुनि आलासी लवलाही ॥४॥ प्रल्हादेंज तुजलागीं स्मरिलें निर्वाणीं । संकटापासुनि रक्षियेलें ॥५॥ नामा म्हणे थोर पिडिलों गर्भवासें । अखंड पाहातसें वाट तुझी ॥६॥