भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिक भक्तबळी । विठो आणिला भूतळीं

pundalik bhaktabali | vitho anila bhutalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुंडलिक भक्तबळी । विठो आणिला भूतळीं ॥१॥ अनंत अवतार केवळ । उभा विटेवरी सकळ ॥२॥ वसुदेवा न कळे पार । नाम्यासवें जेवी फार ॥३॥ भक्त भावार्थां विकला । दासी जनीला आनंद झाला ॥४॥