भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीति नाहीं रायें वर्जियेली कांता । परि तिची सत्ता जगावरी

priti nahin rayen varjiyeli kanta | pari tichi satta jagavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रीति नाहीं रायें वर्जियेली कांता । परि तिची सत्ता जगावरी ॥१॥ तैसे दंभधारी आम्ही तुझे भक्त । घालूं यमदूत पा-यांतळीं ॥२॥ रायाचा तो पुत्र अपराधी देखा । तो काय आणिका दंडवेल ॥३॥ बहात्तर खोडी देवगण कंठीं । आम्हां जगजेठी नामा म्हणे ॥४॥