भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा । त्रिभुवनींच्या तीर्थां मुगुटमणि

premamrut sarita pavitra harikatha | tribhuvaninchya tirthan mugutamani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा । त्रिभुवनींच्या तीर्थां मुगुटमणि ॥१॥ तेथें माझ्या मना होईं क्षेत्रवासी । राहें संतांपाशीं सुख घेतां ॥२॥ ऐहिक्य परत्र दोन्हीं समतीरीं । परमानंदलहरी झेंपावत ॥३॥ मुक्तांचें जीवन मुमुक्षा माउली । शिणल्या साउली विषयासक्तीं ॥४॥ परमहंसकुळ सनकादिक सकळ । राहिले निश्चळ करोनि नित्त ॥५॥ नामा म्हणे मना सोइरे हरिजन । तारक त्याचें चरण दृढ घरीं ॥६॥