भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमळ तूं भक्ता माझ्या नामदेवा । जीवींचा विसावा भक्त तूंची

premal tun bhakta majhya namadeva | jivincha visava bhakta tunchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रेमळ तूं भक्ता माझ्या नामदेवा । जीवींचा विसावा भक्त तूंची ॥१॥ तुमचेनि माझें देवपण सत्य । चंद्रें पाझरत सोमकांत ॥२॥ तुमचे भक्तीनें आणिलें रूपासी । अवाच्या अविनाशी अरूप तें ॥३॥ पंढरिचा राणा सांगतो ह्या खुणा । भक्तांच्या कारणा येणें मज ॥४॥