भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळीं प्रहार रात्रीं गोणी बाळा । घुसळण मांडियेलें घरोघरीं सकळां । नित्यानंदें परमानंदें गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा

prat:kalin prahar ratrin goni bala | ghusalan mandiyelen gharogharin sakalan | nityananden paramananden gati gopala | sahsrapari kaisha gati madan sanvala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रात:काळीं प्रहार रात्रीं गोणी बाळा । घुसळण मांडियेलें घरोघरीं सकळां । नित्यानंदें परमानंदें गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा ॥१॥ घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदें छंदें डोलती ॥ध्रु०॥ एक म्हणती साजणी तुम्हीं लपवागे लोणी । नकळे हो बाई कृष्णाची करणी । कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणी । खास खांदूनि तुम्हीं आतां लपवा दुधाणी ॥२॥ बोलतां चालतां इतुक्यामध्यें हरी आला । कवणेंहीं नाहीं देव द्दष्टि देखिला । सूक्ष्म रूप धरूनि डेर्‍यामध्यें प्रवेशला । वरच्यावरी देव लोणी खाऊनियां गेला ॥३॥ उन्हवणी शिळवणी घालिती परतें लोणी येईना । काय झालें ढोणे सासूबाई कळेना ॥४॥ हा हा गे बायांनो तुमचे जाणतें चाळे । यश्वदेच्या मुला नेऊनि देतसां गोळे । उगोंचि मग पाहतां आतां फिरगे निराळे । मारी ठोसरे दोन्ही गाल्होरे घेतले ॥५॥ डेर्‍यामधून मार माझा जगजीवन पाहे । नामा म्हणे धन्य धन्य वर्णूं मी काये ॥६॥