भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळीं मात झाली गोकुळांत । जातो भगवंत मथुरेसी

prat:kalin mat jhali gokulant | jato bhagavant mathuresi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रात:काळीं मात झाली गोकुळांत । जातो भगवंत मथुरेसी ॥१॥ गौळणींचा मेळा मिळाला सकळ । पिटिती कपाळ आपुले हातें ॥२॥ एकी त्या घालीती केंसामध्यें माती । एक त्या लोळती भूमीवर ॥३॥ आह्मां सोडूनियां तू रे कैस जासी । तुजविण पीशीं आह्मी सर्व ॥४॥ कोणी रथापुढें जाऊनि पडली । आक्रोशें रडती सकळीक ॥५॥ अक्रूर नव्हे बाई मोठा असे क्रूर । नामीं निरंतर क्रीया वसे ॥६॥ अक्रूर आह्मी सर्व पसरीतों पदर । नेऊं नको श्रीधर मथुरेसी ॥७॥ नामा ह्मणे शोक न वर्णवे आतां । झाला तो हाकिता रथ त्वरें ॥८॥