भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रर्‍हाद रक्षिलें पांडवां प्रतिपाळिलें । तया उभें केलें पुंडलिकें

prar‍had rakshilen pandavan pratipalilen | taya ubhen kelen pundaliken

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रर्‍हाद रक्षिलें पांडवां प्रतिपाळिलें । तया उभें केलें पुंडलिकें ॥१॥ बिभिषणा स्थापिलें ध्रुवासी अढळ केलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥२॥ चौद्यादि मर्दिले सुरवर तारीले । तया उभें केलें पुंडलीकें ॥३॥ अहिल्ये उद्धरिलें गजेंद्रा उद्धरिलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥४॥ गयासुरा वधिलें बळिस पाताळीं घातलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥५॥ नामा म्हणे केशवा भक्तांचें ठेवणें । घेऊनि केंवि जाणें घडे तुज ॥६॥