भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । भक्त राजेश्वर ह्मण-ताती

pralhadakaranen stambhin avatar | bhakta rajeshvar hman-tati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । भक्त राजेश्वर ह्मण-ताती ॥१॥ जळीं स्थळीं आहे सर्वां ठायीं हरी । प्रत्यक्ष तूं न्या-हारी स्तंभामाजी ॥२॥ ऐकतांचि वाणी क्रोधासी चढला । खड्ग तो काढिला कोशांतून ॥३॥ तयेकाळीं हाक मारिली प्रचंड । फोडिलें ब्रह्मांड नरसिंहेम ॥४॥ धरूनियां दैत्य वेगीं मांडीवरी । नखानें तो चिरी पोट त्याचें ॥५॥ जयजयकार झाला ब्रह्मादि पातला । इंद्रा-दिक आला देवांसहित ॥६॥ करूनियां स्तुति देव शांतविला । प्रल्हाद तो झाला पूर्ण भक्त ॥७॥ नामया हो झाली मायबाप भेटी । लाभ उठाउठी आनंदाचा ॥८॥