भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रळयाचे ळाळीं ब्रह्मांड जळालें । कोण त्यांत उरलें सांगा मज

pralayache lalin brahmand jalalen | kon tyant uralen sanga maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रळयाचे ळाळीं ब्रह्मांड जळालें । कोण त्यांत उरलें सांगा मज ॥१॥ प्रभा ते फांकली जाती ते गुंतली । सांग मज खोली स्वरूपाची ॥२॥ ब्रम्हांडाची जेव्हां राख जळून झाली । कोणी ती लाविली अरूपरूपीं ॥३॥ विष्णुदास म्हणे सांगा हेंचि गूढ । नाहीं तरी मूढ होऊनि राहें ॥४॥