भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोर निर्दय जालें देवपिसेंज लागलें । लोकाचें गोविलें तेंहिअ पोर

por nirday jalen devapisenj lagalen | lokachen govilen tenhia por

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पोर निर्दय जालें देवपिसेंज लागलें । लोकाचें गोविलें तेंहिअ पोर ॥१॥ नित्य करी अंघोळी धोत्रेंहि फाडिलीं । कळी मांडियेली याही पोरें ॥२॥ गांवींचे महाजन करिती गुडघे स्नान । या पोरां व्यसन अंघोळीचें ॥३॥ जन्मोजन्मीं नेणों आम्ही ह्या तुळसी । ये पोरें विवसी मांडियेली ॥४॥ गोणाई म्हणे नाम्या तुवां भलें केलें । जया वस्य केलें विठोबासी ॥५॥