भजनी मालिका
← भजनांकडे परत

फुलले अनेक तरुवर तेथ । दुर्वा दर्भ आंत डंवरले

phulale anek taruvar teth | durva darbha ant danvarale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
फुलले अनेक तरुवर तेथ । दुर्वा दर्भ आंत डंवरले ॥१॥ करंज जांभळी लागली एक थाटी । वरी बहु दाटी तरुवरांची ॥२॥ अमृतफळें अपार विस्तारले फार । त्यामाजीं मयूर टाहो देती ॥३॥ कंठ कोकिळा त्या सुस्वर गायन । तरुवर सुमनें परिमळते ॥४॥ पारिजातकांची दाटी थाटी जाली भारी । आंत मैलागिरी डुल्लताती ॥५॥ नामा म्हणे देवा भला हा एकांत । मार्कडेयें तप केलें ॥६॥