भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावावया ब्रह्मपूर्ण । सांडूनि देईं दोषगुण

pavavaya brahmapurna | sanduni dein doshagun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पावावया ब्रह्मपूर्ण । सांडूनि देईं दोषगुण ॥१॥ सर्वांभूतीं समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ॥२॥ यावेगळें थोर नाहीं । बरवें शोधूनियां पाहीं ॥३॥ येणें संसार सुखाचा । ह्मणे नामा शिंपीयाचा ॥४॥