भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाटोळा तिंमलारे मजवरी घालीं कांबळें ॥ध्रु

patola timmalare majavari ghalin kambalen ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाटोळा तिंमलारे मजवरी घालीं कांबळें ॥ध्रु०॥ आषाढमासिचारे कैसा शीतळ वारा । वर्षतो मेहुलारे कैशा शीतल धारा ॥१॥ झिरमिर झिरमिररे कैसा वर्षतो मेहू । जाळीचें घोंगडें बा मजवर घालीं सेवू ॥२॥ प्रेमाचें भरतेंगा कैसा महापूर आला । नामया विष्णुदास केशवराजीं मिनला ॥३॥