भजनी मालिका
← भजनांकडे परत

पारधियासी तेव्हां दाटला गहींवर । लोटलें अपार प्रेम तेव्हां

paradhiyasi tevhan datala gahinvar | lotalen apar prem tevhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पारधियासी तेव्हां दाटला गहींवर । लोटलें अपार प्रेम तेव्हां ॥१॥ जीवदान दिल्हें जावें तुम्हीं आता । न करावी चिंता कांहीं येथें ॥२॥ इंद्राचा मी दूत चुकलों सेवेसी । यालागीं जन्मासी आलों जाणा ॥३॥ तुमचिया बोलें निवालें अंतर । घात इत:पर न करीं कांही ॥४॥ नामा ह्मणे शुभकाळ त्याचा आला । ह्मणवोनि झाला पश्चात्ताप ॥५॥