भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगें प्राप्त होईल सकळ । चरणकमळ ध्यारे मनीं

pandurangen prapta hoil sakal | charanakamal dhyare manin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांडुरंगें प्राप्त होईल सकळ । चरणकमळ ध्यारे मनीं ॥१॥ मनीं मानसिक न करावा कधीं । नाम घ्यारे आधीं केशवाचें ॥२॥ केशवाचें नाम पावन पवित्र । महाभाष्यसूत्र हेंचि सांगे ॥३॥ नामा म्हणे तुम्हीं करावें कीर्तन । पंढरीचें ध्यान चुकों नका ॥४॥