भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीराया माझिया बापें । प्रसन्न केलें तुजप्रतापें

pandhariraya majhiya bapen | prasanna kelen tujapratapen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीराया माझिया बापें । प्रसन्न केलें तुजप्रतापें ॥१॥ आम्हां दिलें तुझे हातीं । पाळीं म्हणे प्रेमभक्ती ॥२॥ तृप्त सहित माझिया मना । क्षेम घालीन तुझिया चरणा ॥३॥ तुझें गुणनाम कीर्तन । हे मज देईंगा जीवदान ॥४॥ देऊनियां प्रेमाचें भातुकें । खेळविसी त्या कौतुकें ॥५॥ विठा म्हणे नामयाचा । प्रसाद तुझीय़े कृपेचा ॥६॥