भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया

pandharinivasa sakhya panduranga | kari angasanga bhaktachiya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥ भक्त कैवारिया होसी नारायणा । बोलतां वचना काय लाज ॥२॥ मागें बहुतांचे फेडियेलें ऋण । आम्हांसाठीं कोण आली धाड ॥३॥ वारंवार तुज लाज नाहीं देवा । बोल रे केशवा म्हणे नामा ॥४॥