भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीची वारी जयाचिये कुळीं । त्याची पायधुळी लागो मज

pandharichi vari jayachiye kulin | tyachi payadhuli lago maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीची वारी जयाचिये कुळीं । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥ तेणें त्रिभुवनीं होईन सरता । नलगे पुरुषार्था मुक्तिचारी ॥२॥ नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा । क्षण जिवावेगळा नकरीं त्यासी ॥३॥ नामा म्हणे माझा सोयरा -जिव – लग । सदा पांडुरंग तयाजवळी ॥४॥