भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचा वारकरी । त्याचे पाय माझे शिरीं

pandharicha varakari | tyache pay majhe shirin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचा वारकरी । त्याचे पाय माझे शिरीं ॥१॥ हो कां उत्तम चांडाळ । पायीं ठेवीन कपाळ ॥२॥ वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषेश्वरा ॥३॥ मुखीं नाम गजें वाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥