भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचा पोहा आला आळंकापुरीं । पंच कोसावरी साधुजन

pandharicha poha ala alankapurin | panch kosavari sadhujan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचा पोहा आला आळंकापुरीं । पंच कोसावरी साधुजन ॥१॥ पांडुरंगा संगें वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यस ॥२॥ पताकांचे भार निघाले बाहेर । भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३॥ अवघिया भेटी जाल्या त्या बाहेरी । मग आळंकापुरी येते जाले ॥४॥ सोपानानें मग केला नमस्कार । उतरिले पार पांडुरंगा ॥५॥