भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचा देव तत्सच्चित अद्वय । तूंचि बापमाय पांडु-रंगा

pandharicha dev tatsachchit advay | tunchi bapamay pandu-ranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचा देव तत्सच्चित अद्वय । तूंचि बापमाय पांडु-रंगा ॥१॥ सगुण निर्गुण दाविसी प्रकर । दाही अवतार निमि-तासी ॥२॥ ऐसा माझा स्वामी समर्थ गोविंद । निरंतर छंद हरि-नामीं ॥३॥ नामा ह्मणे कांहीं न धरिसी लाज । भाविकांसी गुज कानीं सांगे ॥४॥