भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचा देव पाहतां सगुण । प्रर्‍हादाकारणें सिद्ध झाला

pandharicha dev pahatan sagun | prar‍hadakaranen siddha jhala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचा देव पाहतां सगुण । प्रर्‍हादाकारणें सिद्ध झाला ॥१॥ पंढरीचा देव पतित पावन । उभा नारायण विटेवरी ॥२॥ पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार । बाळ्या भोळ्या पार दावीतसे ॥३॥ नामा ह्मणे देवा कीर्ति वानूं काय । आह्यांसाठीं सोय लावीं बापा ॥४॥