भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरिचा देव बहुत कोंवळा । सगुण सांवळा सारथि हा

pandharicha dev bahut konvala | sagun sanvala sarathi ha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरिचा देव बहुत कोंवळा । सगुण सांवळा सारथि हा ॥१॥ सारथि सर्वांच्या साक्षिभूत असे । संकटीं सायासें गजेंद्रासी ॥२॥ गजें-द्रासी रक्षी गणिका उद्धरी । भिल्लीणीचे करीं फळें भक्षी ॥३॥ भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टिभरी । नामा ह्मणे हरि गोड मानी ॥४॥