भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरपुरी गेले प्रार्थीले वीला चिदंबर कोण सांगे मला

pandharapuri gele prarthile vila chidambar kon sange mala

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
पंढरपुरी गेले प्रार्थीले वीला चिदंबर कोण सांगे मला ।।१।। रात्री हो द्रष्टांती विठ्ठल सांगती रूप होवोनी बोलती चिदंबराचे ॥२॥ मीच अवतरीलो चिदंबररूपे जावे तुवा तेथे कर्नाटक ||३|| विठाबाई म्हणे आनंद निघाले कुंदगोळी आले स्वामीजी ॥४॥