भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांचा सातांचा आहे येक जागां मेळा । देताती कवळा येकयेकां

pancha satancha ahe yek jagan mela | detati kavala yekayekan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांचा सातांचा आहे येक जागां मेळा । देताती कवळा येकयेकां ॥१॥ करू पाहातां मज जिताची विटंबना । म्हाणोनी नारायेणा पळोनी आलों ॥२॥ पाहिला तयाचा मानस आदर । जमा केला केर जाळावयाअ ॥३॥ त्यांच्या धाकें मागें आलों रे अनंता । येत तुझ्या चित्ता बरें त्यांचें ॥४॥ नामा म्हणे जीवें आलों वांचवोनी । अझुनि तरी चक्रपाणि वांचवी मज ॥५॥