भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाला खाऊनियां धाला बहिणी घरीं । भक्तिलागीं हरि वेडा झाला

pala khauniyan dhala bahini gharin | bhaktilagin hari veda jhala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाला खाऊनियां धाला बहिणी घरीं । भक्तिलागीं हरि वेडा झाला ॥१॥ सुदाम्याचे पोहे कोरडेचि खाय । मटमटां पाहे चहूंकडे ॥२॥ विदुराच्या कण्या खाय धणीवरी । झाला बळिचे द्वारीं द्वारपाळ ॥३॥ नामा ह्मणे हरिचे न कळती पवाडे । नेणों भक्तां-पुढें वेडा झाला ॥४॥