भजनी मालिका
← भजनांकडे परत

पक्षिणी प्रभाते चारियासी जाये । पिलें वाट पाही उपवासी

pakshini prabhate chariyasi jaye | pilen vat pahi upavasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पक्षिणी प्रभाते चारियासी जाये । पिलें वाट पाही उपवासी ॥१॥ तैसें माझें मन करी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥ तान्हें वत्स घरीं बांधलेंसे दावा । तया ह्रदयीं धांवा माउलीचा ॥३॥ नामा म्हणे केशवा तूं माझा सोईरा । झणें मज अव्हेरा अनाथनाथा ॥४॥