भजनी मालिका
← भजनांकडे परत

पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा

pakshi jay digantaran | balakansi ani chara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥ घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासी ॥२॥ माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥ वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥ तैंसी आम्हासी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥५॥