भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल विळाचियें वेळीं

pail vilachiyen velin

पैल विळाचियें वेळीं । आंगणी उभी ठेलिये । येतिया जातिया पुसे । विठ्ठल केउतागे माये ॥१॥ पायरऊ जाला संचारु नवल । वेधें विंदान लाविलें म्हणे विठ्ठल विठ्ठल ॥२॥ नेणें तहान भूक । नाहीं लाज अभिमान । वेधिलें जनार्दनी । देवकीनंदना लानोनीगे माये ॥३॥ बापरखुमादेविवरु जिवींचा जिवनु । माझे मनिंचे मनोरथ पुरवीं कमळ नयनुगे माये ॥४॥