भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल दक्षिणेचा वारा । येतां देखिला समोरा

pail dakshinecha vara | yetan dekhila samora

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पैल दक्षिणेचा वारा । येतां देखिला समोरा ॥१॥ चला चला पंढरपुरा । विठोबारायाच्या नगरा ॥२॥ पायीं संतांच्या लागत । पाचारितो पंढरिनाथ ॥३॥ नामा ह्मणे वेग करा । विठ्ठल भक्तांचा सोइरा ॥४॥