भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल आला रामराणा । लंका दिधली बिभिष्रणा

pail ala ramarana | lanka didhali bibhishrana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पैल आला रामराणा । लंका दिधली बिभिष्रणा ॥१॥ नळनीळ जांबुबंत । मध्यें चाले रघुनाथ ॥२॥ मागें वानराचे थाट । पुढें गर्जताती भाट ॥३॥ केला अयोध्या प्रवेश । म्हणे नामा विष्णुदास ॥४॥