भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहिलें श्रीशैल्य निवृत्ती संगम । पापराशी भस्म देखतांचि

pahilen shrishailya nivrutti sangam | paparashi bhasma dekhatanchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाहिलें श्रीशैल्य निवृत्ती संगम । पापराशी भस्म देखतांचि ॥१॥ चालतां सुपंथीं ह्रदयीं विठठलमूर्ति । मुखीं नामकीर्ति गात चाले ॥२॥ अभोळ नरसिंह श्रीवासुदेव । सकळ देवराव व्यंकटाद्री ॥३॥ गेला अरुणाचळा करुनी नमन । चिदंबरा दक्षिणमथुरा कावेरी ॥४॥ वंदुनी जनार्दन गेला रामेश्वरा । हेत जाला पुरा विठठलाचा ॥५॥