भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहे चहूंकडे धुंडोनि सुंदरी । देखे मुष्टी चारी तंदुळिका

pahe chahunkade dhundoni sundari | dekhe mushti chari tandulika

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाहे चहूंकडे धुंडोनि सुंदरी । देखे मुष्टी चारी तंदुळिका ॥१॥ तोचि शुद्धभाव उगवला पुढें । सर्वही तें कोडें देवालागीं ॥२॥ अहं सोहं वृत्ति तेथें एक झाली । द्दष्टीनें देखिली पोह्यांकडे ॥३॥ नामा म्हणे सर्वरूपीं नारायण । बोलाया कारण नाहीं तेथें ॥४॥