भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां

pahatan pandhariraya | tyachya mukti lage payan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां ॥१॥ पुरुषार्थें चारी । त्याचें मोक्ष आर्जव करी ॥२॥ धन संपत्तीचा दाता । होय पाहतां पंढरिनाथा ॥३॥ संताचे चरणीं । लोळे नाचे दासी जनी ॥४॥