भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदक माळा सकलाद । तेथें टाकिली गोविंदें

padak mala sakalad | tethen takili govinden

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पदक माळा सकलाद । तेथें टाकिली गोविंदें ॥१॥ देव तांतडी निघाले । वाकळ घेउनी पळाले ॥२॥ भक्त येती महाद्वारीं । चोर पडले देव्हारीं ॥३॥ नवल झालें पंढरपुरीं । देव राबे दासी घरीं ॥४॥ त्निभुवनांत मात गेली । दासी जनी प्रगटली ॥५॥