भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा । आतां जी केशवा सिद्ध व्हावें

nivruttiraj mhane bhalen kelen deva | atan ji keshava siddha vhaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा । आतां जी केशवा सिद्ध व्हावें ॥१॥ निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी । बोळविलीं सारीं सुखधामा ॥२॥ दाही दिशा चित्त जालें असें सैरा । आतां शारंगधरा सिद्ध व्हावें ॥३॥ आतां माझे श्रम नको घेऊं हरी । जावें त्र्यंबकेश्वरीं समाधीसी ॥४॥ पार माझा प्राण आला असे कंठीं । आतां जगजेठी सिद्ध व्हावें ॥५॥ नामा म्हणे देवा दिवस नाहीं आतां । त्वरें वेगीं संता सिद्ध करा ॥६॥