भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिराज म्हणे आतां पंढारिनाथा । मुक्ताईला जपा अवघेजण

nivruttiraj mhane atan pandharinatha | muktaila japa avaghejan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिराज म्हणे आतां पंढारिनाथा । मुक्ताईला जपा अवघेजण ॥१॥ वेधली चित्तवृत्ति स्वरूपीं निमग्न । नाहीं देहभान मुक्ताईला ॥२॥ अवघेजण जपती जपे नारायण । चालती घेऊन मध्यभागीं ॥३॥ निवृत्तिराजें धरिली मुक्ताई हातीं । सांभाळित जाती निशिदिनीं ॥४॥ पदोपदीं जपे निवृत्तिराज करें । आणिक ऋषीश्वर सांभाळिती ॥५॥ नामा म्हणे देवा जातां तातडीनें । पुढें स्थळ कोण नेमियेलें ॥६॥