भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिदेवासाठीं स्फुंदती ऋषीश्वर । लविला पदर डोळियांसीं

nivruttidevasathin sphundati rushishvar | lavila padar doliyansin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिदेवासाठीं स्फुंदती ऋषीश्वर । लविला पदर डोळियांसीं ॥१॥ गरुडावर पुंडलिकें घातियेला साज । जाती निवृत्तिराज समाधीसी ॥२॥ चालती विमानें वाजतसे घंटा । उठा आतां भेटा अवघेजण ॥३॥ समाधीभोंवते कुंकुमाचे सडे । पाहती निवाडे योगीराज ॥४॥ कीर्तन गजरीं गेलीसे मंडळी । बैसली ते पाळी समाधीच्या ॥५॥ नामा म्हणे पुढें उभे नारायण । आरंभिलें नमन निवृत्तिराजें ॥६॥