भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । कांही केल्या मन राहात नाहीं

nivruttidev mhane karitan samadhan | kanhi kelya man rahat nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । कांही केल्या मन राहात नाहीं ॥१॥ बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाट मुरडताती ॥२॥ बांधल्या पेंढीच्या सुटलासे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥ हरिणीविण खोपी पडियेली वोस । दशदिशा पाडसें भ्रमताती ॥४॥ मायबापें आम्हां त्यागियेलें जेव्हां । ऐसें संकट तेव्हां जालें नाहीं ॥५॥ नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचें ॥६॥